तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून ऐतिहासिक निधी मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर भव्य नागरी सत्कार सोहळा गुरुवार, दिनांक 07 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजता श्री भवानी कुंड, घाटशिळ रोड, पार्किंग शेजारी, तुळजापूर येथे आयोजित केला आहे.
यामध्ये ना. चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य), ना. प्रतापराव सरनाईक (पालकमंत्री व परिवहन मंत्री), आमदार राणाजगजितसिंह पाटील (आमदार, तुळजापूर व उपाध्यक्ष मित्र) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख आध्यात्मिक महंत तुकोजीबुवा, महंत इच्छागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत हमरोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत व्यंकट अरण्य महाराज, गुरू महंत वाकोजीबुवा उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास माजी मंञी मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजीमंञी तानाजी सावंत, आ. अभिमान्यु पवार, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी.खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार राजेंद्र राऊत, नितीन काळे, अनिल काळे, दत्ता कुलकर्णी, सुरज साळुंके, महेंद्र धुरगुडे, नेताजी पाटील, नारायण नन्नवरे, अँड. अशिष सोनटके, अँड. दीपक आलुरे, अनंत पांडगळे, तानाजी कदम, श्रीकृष्ण सूर्यवंशी, अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शामराज हे असून, निमंत्रक म्हणून विनोद (पिटू) गंगणे, आनंद कंदले, सचिन रोचकरी, शांताराम पेंडे सह अन्य जण आहेत. तरी तुळजापूर शहरवासीयांनी या भव्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.