उमरगा (प्रतिनिधी)- बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन करुन सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. सोने तारण, सोलार कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, मराठा तरुणांना व्यवसायासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज माफक व्याजदराने वाटप करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात शुन्य टक्के एनपीए करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असुन याला सर्व सभासदांनी सहकार्य करावे. सभासदांना 7 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले. 

उमरगा जनता सहकारी बँकेची 29 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.25) उमरगा येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर काशी,श्रीशैल्यमव उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे व्हा. चेअरमन ॲड. विरसंगप्पा आळंगे, माजी चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रदिप पणुरे, विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गवसाने, बँकेचे संचालक डॉ. दिलीप गरुड, मदन पाटील, रफिक तांबोळी, ॲड. संजय बिराजदार, विनय बदोले, भरत मारेकर, अण्णाराव कांबळे, वनिता कारभारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे, बलभिम पाटील, प्राचार्य डॉ. राम सोलनकर, शिवलिंग माळी, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, पंकज खरोसेकर, गौस शेख, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, प्रताप पाटील, महालिंग बाबशेट्टी, महेश माशाळकर, चंद्रशेखर पवार, यशपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, चैतन्यमुर्ती माधवराव काका पाटील यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या उमरगा जनता बँकेने बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इवल्याशा रोपटयाचा वटवृक्षात रुपांतर झाले आहे. धाराशिव, लातुर, सोलापूर जिल्हयात बँकेच्या शाखा आहेत. बँकेचा विस्तार करणेसाठी आपण प्रयत्नशील असुन लातुरला नविन शाखा लवकरत सुरु करत आहोत. बँकेकडे क्यु आर कोडची सुविधा आहे. सभासदांनी जागृत होऊन वेळेवर कर्जाची परतफेड करणे गरजेचे आहे. बँकेकडे 225 कोटींच्या ठेवी आहेत. सभासदांचे भागभांडवल 8 कोटी 35 लाख, राखीव निधी 22 कोटी 20 लाख, सभासदांना 115 कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅकेचा 4 कोटी रुपयाचा ढोबळ नफा, खेळते भांडवल 266 कोटी 68 लाख रुपये, गुंतवणूक 135 कोटी 24 लाख रुपये आहे. बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे चेअरमन शरण बसवराज बसवराज पाटील यांनी सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व संचालक, शाखाधिकारी, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हा. चेअरमन ॲड. व्ही. एस. आळंगे यांनी प्रास्ताविक करुन अहवाल वाचन केले. शौकत पटेल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन करुन श्रध्दांजलीचा ठराव मांडला तर संचालक भरत मारेकर यांनी आभार मानले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top