धाराशिव (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून, धाराशिव प्रशाला व स्वामी रामानंद तीर्थ प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला.

धाराशिव प्रशालेचे मुख्याध्यापक पंडित जाधव यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत माळी यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. रमण जाधव यांनी करून स्वातंत्र्यदिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. आभार प्रदर्शन श्री.रामेश्वर चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमाला दोन्ही शाळेतील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देशभक्तीची उमेद आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता.

 
Top