धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या 38 वा स्मृतिदिनानिमित्त “ज्ञानसुर्य शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे ' या विषयावर बोलताना डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी वरील प्रतिपादन केले.
सर्वप्रथम डॉ.सी आर दापके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांना अभिवादन करण्यात आले. डॉ हंगरगेकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आजची तरुण पिढी छोट्या स्क्रीनच्या विळख्यात अडकलेली आहे. या मधुन बाहेर निघाल्यानंतर तरुणांना संस्कारांचे एक मोठे आकाश दिसेल. ते आकाश म्हणजेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे संस्कारक्षम विचार,त्यांची समाजाशी असलेली बांधिलकी या आकाशाच्या सहवासात आल्यावर जगण्याचा अर्थ समजेल. हरवत चाललेली माणूसकी बापूजींच्या विचारांमध्ये जाणवेल. महापुरुषांच्या चारीत्र्यातुन व्यक्तीमत्व घडत असते त्यासाठी आपण त्यांचा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. सत्य,शिल प्रामाणिकता त्याग पिळवणूक प्रवृतीस आळा बापूजींच्या या विचारांची पारायणे समाजात झाली पाहिजेत तरच नव्या पिढीला न्याय मिळेल. बेभान होऊन जगणारी पिढी भानावर येईल. त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक रहावे लागेल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समापन डॉ. सी. आर. दापके यांनी केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कनिष्ठ विभागांतर्गत एक पेड बापूजी के नाम हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बालाजी गुंड यांनी केले. सदर प्रसंगी प्रा बबन सुर्यवंशी, डॉ साखरे , डॉ मारुती लोंढे,प्रा सचिन चव्हाण यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्र प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.