नळदुर्ग (प्रतिनिधी)-  गणेशोत्सवाच्या माध्यमातून बौध्दीक व्याखान मालेतून विद्यार्थ्यावर संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य गेल्या 33 वर्षापासून जपणाऱ्या अंजनी प्रशालेतून भाविष्यात ही संस्कारक्षम शिक्षणाबरोबर धार्मीक आणि राष्ट्रहितासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन शिवसेनेचे उभाठा गटाचे शहर प्रमुख संतोष पूदाले यांनी बोलताना केले.

अंजनी प्रशाले मध्ये दि. 27 ऑगष्ट रोजी श्री गणरायाची स्थापना पत्रकार भगवंत सुरुवसे यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री पूदाले बोलत होते. यावेळी प्रमुख अथिती म्हणून संतोष पूदाले, पत्रकार तानाजी जाधव, लतीफ शेख, जहीर इनामदार, संस्थेचे अध्यक्षा सुभद्राताई मुळे, मुख्याध्यापिका विद्या ठोकळ आदी उपस्थीत होते. यावेळी तानाजी जाधव, भगवंत सुरवसे, सौ. सुभद्राताई मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका  विदया ठोकळ यांनी केले. तर सुत्रसंचालन जितेंद्र मोरखंडीकर यांनी करुन आभार मानले. 


विविध ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना

येथील दिशा नागरी सहकारी पथ संस्थेत ही श्री गणरायाच्या मुर्तीची डॉ. रामदास ढोकळे यांच्या हस्ते पूजन करुन स्थापना करण्यात आली. यावेळी बसवराज धरणे, भाजपाचे नेते सुशांत भूमकर, सुधीर हजारे, पदमाकर घोडके, धिमाजी घुगे, बंडू कसेकर, संजय विठठल जाधव, उमेश नाईक, संजय दशरथ जाधव, बॅकेचे कार्यकारी संचालक भास्कर तडवळकर, व्यवस्थापक उमेश जाधव, कर्मचारी राहूल जाधव, ओंकार महाबोले, महीला कर्मचारी उपस्थीत होते. तर जेष्ठ पत्रकार विलास येडगे, भाजपाचे नेते सुशांत भूमकर, उमेश नाईक, धिमाजी घुगे यांच्या हस्ते गणेश मुर्तीचे पूजन करुन स्थापना करण्यात आली. यावेळी पदमाकर घोडके, बंडू कसेकर, संजय विठठल जाधव, संजय दशरथ जाधव, अमर भाळे, माजी नगरसेवक निरंजन राठोड, पिंटू नळदुर्गकर, अक्षय भोई, उत्तम बनजगोळे, सुभाष समन, शिवाजी नाईक यांच्या सह कार्यकर्ते उपस्थीत होते.

 
Top