भूम (प्रतिनिधी)- फेब्रुवारी 2025 मध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा तसेच एक्सलंट ओलम्पियाड सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केलेल्या होत्या. या परीक्षेत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय 86 गुणवंत  विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा पंचायत समिती सभागृह भूम येथे आज दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

 यावेळी पंचायत समिती भूमचे सन्माननीय गटविकास अधिकारी लक्ष्मणराव वाजे साहेब तसेच गटशिक्षण कार्यालय भूमचे कार्यालयीन विस्तार अधिकारी श्री साळुंखे साहेब आणि श्री टकले साहेब तसेच शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे सर केंद्रप्रमुख श्री खांडेकर सर बाळासाहेब कांबळे सर व केंद्रीय मुख्याध्यापक संभाजी भोसले सर लोकमान्य विद्यालय मानकेश्वर चे प्राध्यापक किसन अंधारे सर व पालक प्रतिनिधी गोरख शिंदे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती गटशिक्षण कार्यालयाचे कार्यालय विस्तार अधिकारी श्री साळुंखे साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती भूम चे गटविकास अधिकारी श्रीमान लक्ष्मणराव वाजे साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदीप मोरे यांनी केले विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरव पत्र व सन्मानचिन्ह देऊन  सन्मानित करण्यात आले तसेच गटविकास अधिकारी श्रीमान वाजे साहेब यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व पाठीवरती कौतुकाची थाप दिली मंथन परीक्षेचा उद्देश ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची गोडी निर्माण होवून स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम व्हावा हा असून यासाठी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मा श्री राहूल भट्टी साहेब यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्ता गुंजाळ सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री दत्ता घोडके सर यांनी मांडले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत जगदाळे सर रवींद्र भोंग सर मुकुंद हाडुळे सर शिवप्रसाद स्वामी सर विजय माळी सर सुनील हजारे सर संदीप मोरे सर दत्ता गुंजाळ सर व दत्ता घोडके सर यांनी परिश्रम घेतले या या कार्यक्रमाचे आयोजन भूम तालुका मंथन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा समन्वयक सौ अश्विनी प्रशांत जगदाळे मॅडम यांनी केले


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top