तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर सोलापूर रस्त्यावर सांगवी मार्डी गावाजवळ सोमवारी महाराजा कंपनीची प्रवासी बस (एमएच 20 डीडी 0507) रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत उलटली. या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले असून त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे.

सकाळी पावणे सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर बसचे मुख्यद्वार अडकल्याने प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या इतर ट्रॅव्हल्समधील प्रवासी व चालकांनी समोरची काच फोडून मदतकार्य केले आणि जखमींना बाहेर काढले.  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसमध्ये सुमारे 50 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार बसचे स्टेरिंग रॉड तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
Top