धाराशिव (प्रतिनिधी)- स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे जिल्हाध्यक्ष मेसा जानराव यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी स्वातंत्र्य मजूर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद भालेराव, बाळासाहेब माळी, चंद्रकांत पांढरे, तुकाराम पवार, विनोद हावळे, बालाजी हातागळे, सोपान कुदळे, रेखा सुळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांनी समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य, त्यांच्या साहित्यातून उठवलेले श्रमिकांचे दुःख आणि त्यांच्या लढ्याचा आदर्श सर्वांसमोर मांडण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे स्मरण करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.


 
Top