भूम (प्रतिनिधी)-  ऑटो रिक्षाची सेवा ही नागरिकांची गरजेची झालेली आहे. रिक्षा चालक - मालकांना शासनाकडून जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. याचसाठी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे मत सम्राट अशोक चक्रवर्ती रिक्षा चालक मालक असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अरविंद बगाडे यांनी बैठकीत बोलताना केले. 

रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सम्राट अशोक चक्रवर्ती रिक्षा चालक-मालक असोसिएशनची नवीन शाखा उद्घाटनाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष अरविंद बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी संत तुकाराम चौक उर्फ फ्लोरा चौक येथे नवीन रिक्षा स्टॉपची कार्यकारी जाहीर केली. या कार्यकारणीच्या अध्यक्षपदी जावेद इकबाल पठाण यांची निवड जाहीर केली. प्रसंगी मार्गदर्शक म्हणून पत्रकार शंकर खामकर व मुकुंद लगाडे यांची उपस्थिती होती.

यावेळी फ्लोरा चौक उर्फ संत तुकाराम चौक येथील रिक्षा स्टॉप शाखेच्या उपाध्यक्ष जावेद उस्मान शेख, मनोज बळीराम कुंभार, नय्युम हनीफ शेख, सदस्य नदीम राजू पठाण, शैलेश दिगंबर रेपाळ, अन्वर चांद शेख, कल्याण उद्धव जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उपाध्यक्ष धम्मदिथ अजिनाथ लगाडे, राहुल, महादेव वायाळ, किशोर भारत मिटकरी, हनुमंत घुले, भारत घूले, बाळासाहेब उत्तरेश्वर माने, धीरज सोनवणे, सचिन वडेकर, जयसिंग साठे आदीं उपस्थित होते.

 
Top