धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील जुनी गल्ली येथील जय मल्हार तरुण गणेश मंडळाच्या वतीने पारंपरिक थाटामाटात आणि ढोल-ताशांच्या गजरात वाद्यपूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. गणेशोत्सवाच्या स्वागताची ही मंडळाची खास परंपरा असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या पूजनाचा मान शिवसेना जिल्हाप्रमुख मा. सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या हस्ते संपन्न झाला. ढोल, ताशा, टाळ, मृदंग आदी पारंपरिक वाद्यांची सजावट आणि पूजा मोठ्या श्रद्धेने पार पडली. परिसर ढोलताशांच्या निनादात आणि टाळांच्या लयीत भक्तिरसात न्हाल्यासारखा भासत होता. बाप्पाच्या स्वागतासाठी वाद्यपूजनाच्या माध्यमातून घोषणाच दिल्याचे वातावरण उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते.

यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील अनेक गणेशभक्तांसोबतच नितीन देवकते, ज्ञानेश्वर ठेवरे, आबा देवकते, अशोक सोलंकर, राजाभाऊ देवकते, रामेश्वर घोगरे, दत्ता देवकते, सागर कदम, बंडू देवकते, रवी देवकते आदी मान्यवर मंडळासोबत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.

या वेळी बोलताना सुरज साळुंके यांनी सांगितले, "धाराशिवसारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात अशा मंडळांच्या कार्यातून नव्या पिढीत भक्तिभाव, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि परंपरेप्रती आदर निर्माण होतो, हे विशेष आहे. जय मल्हार तरुण गणेश मंडळ हे धाराशिवमधील एक अग्रगण्य मंडळ असून, दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान अशा सामाजिक उपक्रमांमधून शहरात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “वाद्यपूजन हे केवळ पूजन नसून, गणपती बाप्पाच्या आगमनाची पहिली साद आहे. यंदा देखील मंडळ सामाजिक उपक्रम आणि शिस्तबद्धतेने गणेशोत्सव साजरा . करणार आहे.”

 
Top