धाराशिव (प्रतिनिधी) –डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डाॅ. मनिषा असोरे, वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजना समन्वयक प्रा. डाॅ. गोविंद कोकणे, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, डाॅ. जितेंद्र शिंदे, वरिष्ठ सहाय्यक विश्वास कांबळे, अभियंता प्रवीण आळंगे, संजय जाधव, रविंद्र सोनवणे, सुधाकर राठोड, ग्रंथालय वरिष्ठ सहाय्यक तुकाराम हराळकर, औदुंंबर गाढवे, अशोक लोंढे, विठ्ठल कसबे, शिवराज वाघमारे, बालासाहेब वाघमारे, इंद्रजित भालेकर, मल्हारी कवडे, हेमंत रसाळ, संदिप कांबळे इ. उपस्थित होते.

 
Top