उमरगा (प्रतिनिधी)- कोराळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे छत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अशा जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि. 1 ऑगस्ट रोजी केली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूकंपग्रस्त गावांमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये विविध संघटना व शासन यांचे मार्फत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. यास 30 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे. सद्यस्थिती पाहिली असता दि.1 ऑगस्ट रोजी पहाटे मौजे कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव येथे अचानक 2010 फुट शाळेचा स्लॅब कोसळला आहे. शाळा चालू नसल्याने जिवीत हानी झाली नाही. शाळेचे पुढील कॉलम विटेने बांधण्यात आले असल्याने पूर्ण इमारतीला धोका आहे. त्यामुळे भविष्यात जिवितहानी होऊ शकते. 

जिल्हा परिषद शाळा भूकंप झाल्यानंतर 1997 साली बांधण्यात आल्या आहेत त्या शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी आपल्या स्तरावरुन तातडीने कार्यवाही व्हावी. तसेच भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व शासनाकडे इमारत व गावातील खराब रस्त्यांची सद्यस्थितीची माहिती पाठवावी. यासाठी निधीची तरतूद होणे गरजेचे आहे. असा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

 
Top