तुळजापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गट तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांची पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याची शक्यता असल्याची  चर्चा धाराशिवच्या राजकारणात रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. विशेषत: पक्ष संघटनात्माक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून धाराशिव जिल्ह्यात पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा धाराशीवच्या राजकीय मंडळीत सुरु असुन, पक्षश्रेष्ठींनी तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांचे जनमानसातील संपर्क, पक्षसंघटना वाढीसाठी केलेले काम, शेतकरी कष्टकरी कामगार मजुर इत्यादींच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढुन प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील पक्षबांधणी यात केलेल्या कामाचे फळ पक्षाकडून जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागुन मिळणार अशी चर्चा धाराशीवच्या राजकीय मंडळीत व नागरीकात होत आहे.

 
Top