भूम (प्रतिनिधी)- तालुक्यासह शहरात लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साठे नगर, रमाईनगर येथील लहुजी नगर, कसबापेठेसह शहरात विविध ठिकाणी आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
शहरातील मध्यवर्ती जयंती उत्सव कमेटीच्या वतीने शुक्रवार दि. 1 रोजी आण्णाभाऊ साठे नगर येथे पालीकेचे गट नेते संजय गाढवे, उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे, पो नि श्री गणेश कानगुडे व समाजातील जेष्ठ नागरीक, महिला यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. तर ध्वजारोहन ही यांच्याच हस्ते करण्यात आले. यावेळी गटनेते संजय गाढवे, नियोजन समितीच्या सदस्या उपनगराध्यक्षा संयोगिता गाढवे, पो नि श्रीगणेश कानगुडे, युवा नेते साहिल गाढवे, मेहराज बेगम सय्यद, साई उदयोग समुहाचे सुमित तेलंग, माजी नगर सेवक विजया साठे, सरीका थोरात, उदयोजग संजय साबळे, वस्ताद मामु जमादार, नगर सेवक सागर टकले संजय पवार, बाळासाहेब सुर्वे, शिक्षक अमोल गायकवाड, एस जी फॅन क्लब चे सुरज गाढवे, आतुल उपरे, अण्णा साठे, सचिन साठे,भाजपा चे रोहन जाधव, दत्ता साठे, सुनिल थोरात, आर पी आयचे भागवत शिंदे, रईस कासी, समस्त पत्रकार बांधव यांच्यासह सार्वजनिक मध्यवर्ती जयंतीचे प्रविण साहेबराव साठे, उपाध्यक्ष-रविंद्र वसंत साठे, कोषाध्यक्ष-किरण महादेव साठे , सचिव-सचिन आण्णा साठे यावेळी समाजातील समाजातील ज्येष्ठ नागरिक दत्ता साठे, आण्णा साठे, कांता साठे, शरद साठे, श्रीरंग साठे.प्रा.दत्ता साठे सर सुमित तेलंग, अमोल सर गायकवाड. प्रवीण साठे, किरण साठे, सचिन साठे, रविंद्र साठे, प्रमोद अडागळे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते