तुळजापूर (प्रतिनिधी)- साहित्य क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी केलेले काम अतुलनीय आणि नेत्र दीपक आहे नव्या पिढीने या साहित्याचा उपयोग केला पाहिजे असे प्रतिपादन अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. श्रीरंग लोखंडे यांनी केले.

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या निमित्ताने प्राचार्य डॉ. मुकुंद गायकवाड यांनी प्रतिमापूजन केले. मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शिवाजी जेटिथोर यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी लोकमान्य टिळक यांच्या जीवन चरित्रावर डॉ. मनोज झाडे यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद गायकवाड यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचे विचार मांडले.

प्रमुख वक्ते प्रा श्रीरंग लोखंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राची माहिती दिली अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी कार्य केले विपुल साहित्य निर्मिती करून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी केली. नव्या पिढीने निश्चितपणे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे असे आवाहन या निमित्ताने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन एस कदम यांनी  व आभार डॉ.पांडुरंग शिवशरण यांनी मानले.

 
Top