भूम (प्रतिनिधी)- परंडा येथे सभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना दिलेल्या शब्द खरा होणार का ? एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांना मंत्रीपदी घेणार का ? माजी मंत्री आणि परंडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे बोलल्यानंतर दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली असल्याचे दिसत आहे.

धाराशिव जिल्ह्यांमध्ये राजकारणात शिंदे व सावंत यांची भेट झाल्यानंतर विविध चर्चा ला ऊत आला आहे. आमदार सावंत यांची मंत्रीपदी संधी मिळणार का ? असे चर्चा परंडा मतदारसंघांमध्ये जोरजोराने चालू आहे .पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट सक्रिय करण्यासाठी व आमदार तानाजी सावंत यांची नाराजी दूर   संपवण्याचे प्रयत्न चालू असल्याचे यामधून दिसून येत आहेत.

दि. 5 ऑगस्ट रोजी माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबई येथे प्रवेश घेतल्यानंतर परंडा मतदारसंघात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांना मुंबईत तातडीने येण्याची सांगितले. मुंबईमध्ये दोघांमध्ये राजकीय समीकरण व विविध चर्चा झाल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यासमोर दिसून आले.


मंत्रीपद न मिळाल्यामुळे सावंतांची नाराजी दूर होणार का ?

परंडा मतदारसंघातून तानाजी सावंत थोड्या फरखाने विजयी झाले. धाराशिव जिल्ह्यामधून त्यांच्याकडेच मंत्रीपद येईल. दिसत असताना सावंत यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही. त्यामुळे सावंत नाराज होते. त्यातच शिंदे गटाचे संपर्कप्रमुख व सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सोलापूर येथे मंत्री जयकुमार गोरे यांची शिवाजी सावंत यांनी भेट घेतली होती. त्यामुळे सावंत हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. लगेच पुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजी सावंत यांना तातडीने मुंबई येथे बोलावल्यामुळे चर्चा झाल्यामुळे माजी मंत्री सावंत यांना मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गट पुढील काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे नाराज असलेल्या सावंत यांची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होतो का ? सावंत नाराजी दूर होऊन धाराशिव जिल्ह्यामध्ये सक्रिय होऊन शिंदे गटाला बळ प्राप्त करून देण्यामध्ये कितपत यशस्वी होतील हे पुढील येणाऱ्या काळामध्येच दिसून येणार आहे.


 
Top