तुळजापूर (प्रतिनिधी)-  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात 1 ते 10 ऑगस्ट 2025 या काळात पुरातत्त्व विभागामार्फत जीर्णोद्धाराचे काम सुरू  असल्याचा पार्श्वभूमीवर  शुक्रवार  दि. 1 ऑगस्ट पासुन भाविकांना भवानी शंकर गर्भगृहातील घाटी घालुन  मुखदर्शन रांगेतुन दर्शन दिले जात आहे. सध्या  भाविकांना देविचे वीस ते पंचवीस फुटावरुन देविचे दर्शन घडवले जात आहे.  

श्रावणमास पार्श्वभूमीवर देविदर्शनार्थ भाविकांची गर्दी होत असुन, धर्मदर्शन पेडदर्शन रांग बंद केल्याने आता एकमेव्य मुखदर्शन रांगेतुन भाविकांना दर्शन घडवले जात असल्याने भाविकांना दर्शनार्थ  वेळ लागत आहे. सध्या सुरक्षा यंञणेवर ताण पडत आहे. धर्मदर्शन, देणगी दर्शन रांग बंद असल्याने भाविकांना श्रावणात सुलभ दर्शन घडण्यासाठी मंदीर अधिक काळ खुले ठेवावे अशी मागणी पुढे येत आहे.

 
Top