काटी (प्रतिनिधी)- आसाम राज्यातील गुवाहाटी शहरात सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण राष्ट्रीय प्रशिक्षणातर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अनुस्थापन पाठ्यक्रम या विषयांतर्गत सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककलांनी आणि नृत्यप्रकारांनी आसाममधील आणि देशभरातील आठ राज्यातील रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले.यात विशेषतःतुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका भावना बाबुराव चौधरी यांनी महाराष्ट्राची कला व संस्कृती यावर पी. पी. टी. सादर केली. तसेच गणेश वदंना, कोळी नृत्य,वारी नृत्य, जात्यावरील ओव्या, महाराट्र गीतात सहभाग घेतला. कृष्ण गवळण गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करून भारूड, वारी नृत्य सादरीकरण, जात्यावरील ओव्या, गवळण, आदिवासी नृत्य, कोळी नृत्य, लावणी, आणि जोशपूर्ण पोवाडा यांचे सादरीकरण झाले. कलाकारांच्या रंगदार पोशाखांनी, पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण सभागृह भारावून गेले.
या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाची ओळख इतर राज्यांपर्यंत पोहोचवणे हा होता. गुवाहाटी रिजनल सेंटरचे परिचालक निरंजन भुया, क्षेत्र अधिकारी शशांक पांडे, लेखापाल प्रणब गोस्वामी यांनी अभिनंदन केले.
उपस्थित इतर राज्यातील प्रशिक्षणार्थींनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील विविध लोककला प्रथमच पाहिल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. या सादरीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे च्या वतीने भावना चौधरी,संजय खाडे,बाबासाहेब मांदाडे,
संतोष धोंगडे,कैलास वाघ, सयाजीराव पावरा,डॉ.स्मिता खोपडे,रुपाली पाथोडे ,अनिता माने,सुनीता मासाळकर, तेजस्विनी मासाळकर यांनी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचा समारोप सर्व कलाकारांनी एकत्रितरित्या “जय जय महाराष्ट्र माझा“ सामूहिक राज्यगीताने केला.गुवाहाटी शहरासाठी हीएक संस्मरणीय आणि सांस्कृतिक मैफल ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास वाघ यांनी केले तर आभार संजय खाडे यांनी मानले.