धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची लेखणी श्रमिकांना न्याय देणारी होती असे प्रतिपादन मराठी विभागपमुख  प्रा. राजा जगताप केले.

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्र प्राचार्य ड्रॉ. संदीप देशमुख यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

पुढे बोलताना प्रा. जगताप म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज हे अण्णाभाऊ साठे होते, प्रस्थापित साहित्यातील प्रियकराला प्रियसीच्या चेहऱ्यामध्ये चंद्र दिसायचा तो काळ होता. तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये भाकरीमध्ये चंद्र दिसत होता. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपला आदर्श मानून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गावकूसाबाहेर रहाणाऱ्या समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. 

कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा सचिन चव्हाण, प्रा सुर्यवंशी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरीष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. बालाजी गुंड यांनी केले. तर आभार प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top