तुळजापूर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त  शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी मातंग नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमीत्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  करण्यात आले. प्रारंभी शहरातुन भव्य रिक्षा रँली काढण्यात आली.

यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवा नेते  ऋषिकेश मगर, जनसेवक अमोल कुतवळ, शहराध्यक्ष अमर चोपदार, तोफिक शेख, नरेश पेंदे, बालाजी तट, वाहिद शेख, आकाश शिंदे, माता रमाई सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद कांबळे, चंद्रकांत भोसले, कुमार चौधरी सह मातंग नगर मधील समाज बांधव, शहरातील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. रिक्षाची रॅली घेऊन अण्णाभाऊ साठे चौकामध्ये येऊन मूर्तीची पूजा करण्यात आली.

 
Top