परंडा (प्रतिनिधी)- संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सकल मराठा समाज आपल्या हक्काच्या ओबीसी आरक्षण मागणीसाठी २९ ऑगष्ट पासून मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे.आंदोलनासाठी चलो मुंबईचा नारा देत सकल मराठा समाजाने परंडा तालुक्यातून जास्तीत जास्त बांधवांनी मुंबईला निघावे असे आवाहन गाव निहाय चावडी बैठक घेवून केले जात आहे.यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.कंडारी ,शिराळा, लोणी , जवळा ( नि ),पिंपळवाडी -चांदणी,वाकडी,घारगाव, खानापूर , भोंजा ,कुंभेजा,भोत्रा ,डोमगाव,टाकळी, राजुरी,शेळगाव,कात्राबाद,देवगाव ( खु ),सिरसाव व येणेगाव अशा १९ गावात बैठक घेऊन चलो मुंबई चे आवाहन करण्यात आले असून उर्वरित गावात बैठका सुरूच आहेत.


 
Top