तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बुधवार दि. 6 ऑगस्ट रोजी झालेल्या किरकोळ पावसातच रस्त्यावर पाणी साचून रस्त्यानेच तळ्याचे स्वरूप धारण केले! त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अक्षरशः जलतरणाचा अनुभव आ

सकाळच्या सुमारास शहरात पावसाचा हलकासा जोर होता. मात्र, धाराशिव रस्त्यालगत महामार्गावर  अर्धा रस्तावर पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या पाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांची गैरसोय झाली. स्थानिकांच्या चर्चेनुसार, रस्ता काम नियमानुसार न केल्याने वा वेळोवेळी देखभाल न झाल्याने पाणी निचऱ्यास अडथळा निर्माण झाला असावा. परिणामी, किरकोळ पावसातसुद्धा महामार्गावर तलावाचे दृश्य निर्माण झाले. महामार्ग विभागाने याची तात्काळ दखल घेऊन, सदर ठिकाणी पाणी साचण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


 
Top