धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पधा व्यंकटेश महाजन कॉलेज धाराशिव येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी येथील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम कामगिरी करून यश संपादन केले.
17 वर्ष वयोगट मुले/ मुली मध्ये 88 वजन गटामध्ये योगेश पवार प्रथम क्रमांक, वर्षा वीर 53 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक, 48 किलो वजन गटांमध्ये जानकी कडेम द्वितीय क्रमांक, 48 किलो वजन गटांमध्ये अशा मोहिते तृतीय क्रमांक व 19 वर्ष मुले मुली वयोगटांमध्ये वैष्णवी जाधव 53 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक, 48 किलो वजन गटांमध्ये शिवानी जाधव तृतीय क्रमांक, 60 किलो वजन गटांमध्ये शैलेश शिंदे तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विजयी खेळाडूंचे व क्रीडा विभाग प्रमुख व क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह, विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर, शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर,विठ्ठल म्हेत्रे,संस्थेचे संचालक मंडळ व क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.