धाराशिव (प्रतिनिधी)- कलाविष्कार अकादमी द्वारा मेलडी स्टार्सच्या वतीने प्रख्यात गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांनी गायलेल्या गीतांचे गायन करुन आदरांजली वाहण्यात आली.
प्रथम मेलडी स्टार्सचे मुख्य प्रवर्तक युवराज नळे समन्वयक शरद वडगावकर, सहसमन्वयक मल्हारी माने यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर मुकुंद राजे, मुकुंद पाटील मेंढेकर, कलाध्यापक शेषनाथ वाघ, रविंद्र कुलकर्णी, संगीत शिक्षक अभिमन्यू गायकवाड, सुजित अंबुरे, युवराज नळे, शरद वडगावकर, मल्हारी माने यांनी गायन केले.