कळंब (ंप्रतिनिधी)- अण्णाभाऊ साठे याच्या 105 जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते प्रबुद्ध साठे (प्रबोधनकार ज्येष्ठ विचारवंत, पुणे) यांनी परिर्तनवादी चळवळीत अण्णाभाऊ साठे यांची भूमिका विषयावर प्रभावी विचार मांडले. 

मराठी मातीचा स्वाभिमान जगाच्या विचारपीठावर पोहचविण्याचे काम साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी केले. ते जागतिक कीर्तीचे शिवशाहीर आणि स्त्रीवादी साहित्यिक होते.  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.  कथा, कादंबरी, नाटक आणि शाहिरीच्या माध्यमातून करतांना परिवर्तनवादीची चळवळीत विचारापेक्षा कृतीला महत्व असल्याचे सांगितले. अण्णाभाऊ साठे हे साहित्यिक, समाजसुधारक, लोकशाहीर आणि दलित साहित्याचे प्रवर्तक होते. शिक्षणाच्या मध्यमातून परिवर्तन केले, त्यांचे हे सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 

कार्यक्रमाची सुरुवात आणि अण्णाभाऊ साठे आणि पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.  यावेळी विचारपीठावर संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, डॉ.संजय कांबळे, संचालक व अधिसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान, उपप्राचार्य आप्पासाहेब मिटकरी यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी प्रा डॉ दत्ता साकोळे यांचे अण्णा भाऊ साठे -व्यक्तित्व आणि कर्तृत्व या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.दादाराव गुंडरे यांनी सूत्रसंचालन प्रा.डॉ. दत्ता साकोळे तर उपस्थितांचे आभार विद्यार्थी विकास विभाग अधिकारी प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले. यावेळी प्रा.ए. आर. मुखेडकर, अधीक्षक हनुमंत जाधव आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सहायक ग्रंथपाल अरविंद शिंदे, भालेकर रमेश, अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top