धाराशिव (प्रतिनिधी)-  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव येथे आज दोन मरणोत्तर देहदान झाले.हे देहदान वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पहिले देहदान कै. सुभाष काशिनाथ सुर्यवंशी (वय 75, सेवानिवृत्त शिक्षक) यांचे असून, त्यांच्या दोन मुलांनी संतोष आणि नितीन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, श्रीक्षेत्र नानीजधाम (ता. जि. रत्नागिरी) यांच्या प्रेरणेने हे निर्णय घेतला. दुसरे देहदान कै. सिताबाई बाबुराव रानदिवे (वय 70) यांचे असून, त्यांच्या चुलत नातू दत्ता रानदिवे व गावातील उपसरपंच सतीश खराटे यांच्या प्रेरणेतून हे कार्य घडले.

या दोन्ही देहदानांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात स्वागत करण्यात आले.यासाठी डॉ.स्वाती पांढरे (विभागप्रमुख), डॉ.सुवर्णा आनंदवाडीकर, डॉ.तानाजी लाकाळ (वैद्यकीय अधीक्षक), डॉ.विश्वजीत पवार (न्यायवैद्यक विभाग), प्रशांत बनसोडे, पंकज कसबे व विभागातील इतर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले.संपूर्ण प्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ.शैलेंद्र चौहान यांचे मार्गदर्शन लाभले. या मरणोत्तर देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन अधिक समृद्ध होणार आहे.


 
Top