धाराशिव (प्रतिनिधी)-  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि. 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चॅटबोटचे उद्घाटन केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक अशफत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, प्रवीण धरमकर, संतोष राऊत, अरुणा गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या चॅटबोटच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळून त्या योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे. यामध्ये ज्या 11 योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये शेत रस्ते, शेतकरी आत्महत्या,नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप,संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना,पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, अन्न व नागरी पुरवठा, नैराश्यविरोधी हेल्पलाइन,स्वातंत्र्य सैनिक योजना आणि आणीबाणी काळ बंदी योजना या योजनांचा समावेश आहे.


प्रश्नाचे उत्तर ही मिळणार

या योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी देण्यात आले आहे. वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी चॅटबोटला प्रश्न विचारल्यास तात्काळ प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.चॅटबोटची सेवा ही 24 तास उपलब्ध राहणार आहे. चॅटबोटच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.यावेळी सर्व तहसीलदार उपस्थित होते.

 
Top