तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरूळ येथे विराज बियर शॉपीच्या पाठीमागे मंगळवार दि. 26 ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलिसांनी धाड टाकुन धीरज धर्मराज लबडे वय 51 यांचा जवळ 9660 रुपयाचा अवैध देशी विदेशी दारुचा साठ्यासह ताब्यात घेतले. मंगरूळ येथे विराज बियर शाँपी मागे देशी व विदेशी दारूच्या बाटल्या विकत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपीच्या कब्जात 9660 रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा साठा मिळून आला. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय थोटे, पोअ अरुण शिरगिरे, पोअ सूरज पांचाळ यांनी केली.