कळंब (प्रतिनिधी)- दिनांक 04 जुलै रोजी वैद्यकीय आयुष विभागातील अत्यंत प्रतिष्ठित असणारी परीक्षा,देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रंन्स टेस्ट - 2025 ही परीक्षा एकाच वेळी पार पडली. देशभरातील केवळ 952 शासकिय जागांसाठी सुमारे पन्नास हजार पेक्षा अधिक डॉक्टरांनी हि परीक्षा दिली. महाराष्ट्रात शासकिय एमडी/एमएस या पदांच्या जागा केवळ 124 आहेत. अशा या भयंकर स्पर्धा परीक्षेत काहींनी एक किंवा अनेक वेळा हि परीक्षा देवून यश संपादन करण्याचा प्रयत्न केला. या परीक्षेचा निकाल दिनांक 30 जुलै रोजी रात्री ऑनलाईन जाहीर झाला. यात कळंब शहरातील डॉ.शिवाई सुमित्रा संतोष भांडे यांनी ऑल इंडिया रँक 211(ओबीसीतून 98) रँक,महाराष्ट्रात टॉप टेन तर धाराशिव जिल्ह्यातील एकमेव यशस्वी महीला डॉक्टर असणाचा मान मिळवत,ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सह महाराष्ट्रातील नामांकित शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयात आपले एम.डी./एम.एस.चे स्थान निश्चित केले आहे. 

एका सामान्य कुटूंबातून अति उच्चशिक्षीत होणाऱ्या डॉ.शिवाई यांचे इयत्ता 1 ली ते 10वी पर्यंन्तचे शिक्षण कळंब येथील सावित्रीबाई फुले प्रा.व माध्यमिक शाळेत झाले. तर इयत्ता 11वी व 12वी ही कळंब येथीलच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून झाले आहे. तेंव्हाचे मात्र आता रद्द झालेले प्रादेशिक 70/30 आरक्षणामुळे त्यांची एमबीबीएस ची संधी हूकली होती. पुढे त्यांनी सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग येथील भाईसाहेब सावंत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएस ही पदवी पुर्ण करून, पुन्हा आपण शासकीय महाविद्यालयातून एमडी/एमएस होण्याचे आपले लक्ष मिळविले आहे. प्रचंड अभ्यासातून आपल्याला कोणतेही असामान्य यश मिळविता येते हे पुन्हा एकदा डॉ.शिवाई यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांचा प्रवास हा नवोदित विद्यार्थ्यांकरीता अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे वडील संतोष भांडे हे ही वैद्यकीय शिक्षण समुपदेशक म्हणून सर्वांना परीचीत आहेत. शिक्षण व गुणवत्तेची सेवा करताना आपली तीनही मुलांपैकी एक वकिल व दोन डॉक्टर मुली झाल्याचे समाधान त्यांना आहे. हा अतिशय सामान्य कुटूंबातील डॉ.शिवाई व भांडे कुटूंबियांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

 
Top