तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विधालयात शुक्रवारदि 1रोजी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्ताने संस्थेचे कोषाध्यक्ष विनय भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन,करण्यात  आले.

यावेळी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सूर्यवंशी सर व सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top