धाराशिव (प्रतिनिधी)- गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारा सोबत केली तारेची चोरी करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सदर आरोपीच्या अटकेमुळे पवनचक्की ॲल्युमिनियम तार चोरीचे यामुळे एकूण सहा गुन्हे उघड करण्यास स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी विशाल रामा काळे वय 21 वर्ष रा. पारधी पिढी भुम, जिल्हा धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल आहे. सदर मुद्देमाल तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे. अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे पिकअप सह ताब्यात घेऊन तपासणी केली. त्याचे वाहनात अल्युमिनियम तारेचे बंडल असल्याचे दिसून आले. त्याचेकडे सदर बाबत चौकशी केली असता त्याने सदरच्या ॲल्युमिनियमच्या तारा कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी, मस्सा शिवारातून पवनचक्कीच्या खांबांवरून चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली.
त्यावरून धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे 06 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. त्यावरून तात्काळ पंचनामा करून एकूण 898 मीटर लांबीच्या 2 लाख 69 हजार 400 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत 5 लाख रुपये असा एकूण 7 लाख 69 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीस वाशी पोलिस ठाण्यात हजर केले आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अमंलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.