धाराशिव (प्रतिनिधी)- मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या, गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या 61 व्या वर्षी श्री ची पूजा विधि व व मेजर ध्यानचंद हॉकी खेळाडू हॉकीचा जादूगार यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून यांच्याशी प्रतिमेची, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार , विविध खेळाचे मार्गदर्शक, क्रीडाशिक्षक व आजच्या पुजा विधीचे मानकरीआमदार विक्रम काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आली मंडळाच्या परंपरेनुसार व प्रथेनुसार विविध धर्म ग्रंथांचे पूजन करण्यात आले व राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या पूजा करण्यात आली. भक्ती पूर्ण, भावपूर्ण वातावरणात आनंदाने श्रीयुत काशिनाथ दिवटे मूर्तिकार चित्रकार व राष्ट्रीय खेळाडू यांच्या  आवाजात श्रीगणेश, सह इतर आरत्या शास्त्र पद्धतीने व योग्य मंत्र उच्चारणे करण्यात आली,  यावेळी धाराशिव जिल्हा वॉलीबॉल या खेळामध्ये  शिवछत्रपती पुरस्कार व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू यांना आवर्जून बोलावून माननीय आमदार यांच्या शुभहस्ते क्रीडा दिनाच्या निमित्ताने या सर्व क्रीडापटूंचा मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह मंडळाचा शेला देऊन सत्कार करण्यात आला .अंकुश पाटील, राजकुमार दिवटे, रवींद्र जानगवळी, नरसिंग साखरे ,प्रकाश  मुंदडा, गजानन गवळी ,मनमत पाळणे, काशिनाथ दिवटे ,परंडा ,तुळजापूर, तेर विविध ठिकाणाहून आलेल्या सर्व खेळाडूंचा यथोचित सन्मान करण्यात आला ,यावेळी या सत्कारास उत्तर अनेक सत्कार्यार्थीने मंडळाचे कौतुक केले .

आमदार काळे यांनी आपल्या मनोगतातून मी व माझे वडील या गवळी गल्लीतील गणपतीच्या दर्शनासाठी अनेक वर्षांपासून येत आलो आहोत. या मंडळातल्या लहानातल्या लहान मुलं-मुली व ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्यातील असणारा एक संघपना, एकी व गणेशोत्सवाचा आदर्श या मंडळाकडून घ्यावा. असं म्हणत कौतुक केले संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहान थोर मंडळाचे गणेश भक्त गणेश दूध गणेश सेवक यांना श्रेय द्यावे लागेल या कार्यक्रमाचे संचालन प्रा भालचंद्र हूच्चे व आभार राजकुमार दिवटे यांनी  मानले. शोभेची दारू व फटाक्याची आतषबाजी या याने समारोप करण्यात आला

 
Top