भूम (प्रतिनिधी)- कुटुंब वंशावळ (फॅमिली ट्री )व समाजव्यवस्था कशी असते हे मुलांना समजावे यासाठी प्राइड इंग्लिश स्कूलमध्ये प्रात्यक्षिकासह कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शाळेतील एलकेजी, युकेजी व नर्सरी वर्गातील विद्यार्थ्यांनी आजी-आजोबा, आई-वडील, बहिण, भाऊ, काका-काकी व चुलत भाऊ, बहीण असे पोशाख परिधान करून आले होते. आज संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. संयुक्त कुटुंब नसल्याने मुलांना बहिण भाऊ व्यतिरिक्त इतर नाते संबंध लवकर समजत नाही. या नात्यांची समज मुलांना व्हावी तसेच प्रेम जिव्हाळा वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.   

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुटुंबव्यवस्थेबद्दल आदरभाव, नातेसंबंधांचे महत्त्व तसेच परंपरेची जपणूक करण्याची जाणीव दृढ झाली. कार्यक्रमादरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेघा सुपेकर, दीपिका टकले,भाग्यश्री डांगे यांच्यासह सेविका अरुणा बोत्रे व आशा म्हेत्रे यांनी परिश्रम केले.

 
Top