धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्याच्या विकासाबरोबरच आर्थिक उलाढाल वाढावी यासाठी जिल्ह्यात होणाऱ्या महत्वाच्या 34 प्रकल्पावर लक्ष केंद्रीत केले असून, लवकरच त्याचा रिझल्ट पहायला मिळले. असे मत भाजपाचे आमदार तथा मित्र चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी नियोजन भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या 34 प्रकल्पाची माहिती सांगितली. रामलिंग अभयारण्यात जंगल सफारीसाठी 15 किलो मीटरचा ट्रॅक तयार करणे, तुळजापूरमध्ये प्राणी संग्रहालय उभारणे, नळदुर्ग किल्ला परत पर्यटकांसाठी विकसित करणे यासह धाराशिव, तुळजापूर रेल्वे मार्ग, कौडगावमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणे, तेर जागजित पर्यटनाच्या नकाशावर आणणे, धाराशिव एस टी बसस्थानक व्यापारी संकूल उभारणे, तुळजाभवानी क्रिडा संकूल विकसित करणे, मांजरा, तेरणा नदीवर बॅरेजस्‌‍ बांधणे, आध्या महिला बचत गट ब्रँड विकसित करणे आदी प्रकल्पांचा समावेश यामध्ये आहे.  या पत्रकार परिषदेस भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारी सदस्य अनिल काळे आदी उपस्थित होते. 


चोराखळीचा पण उल्लेख

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये चोराखळी हे गाव अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असून, त्रिशताब्दी वर्षानिमित्त गावाचा विकास करणे अपेक्षित आहे. याविषयी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी येथील ग्रामस्थ मला भेटून गेले असून, चोराखळी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत काही कामे करता येतील का? या विषयी माहिती घेत असल्याचे सांगतिले. 

 
Top