धाराशिव दि.28 (प्रतिनिधी) - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरच्या नरडीवर कोयता ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा नियमित तर दुसऱ्या आरोपीचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची बाजू ॲड अमोल वरुडकर यांनी मांडली. अत्यंत प्रभावीपणे मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टर व इतरांच्यामध्ये वाहनास कट का मारला या कारणावरून डॉक्टरच्या नरडीवर कोयता ठेवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डॉक्टरनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.क्र.378/ 2025 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खोट्या स्वरूपाचा गुन्हा नोंद झाला होता. या प्रकारा नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे या आरोपींचे जामीन करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. या प्रकरणातील एका आरोपीचा नियमित तर एका आरोपीचा अटकपूर्व जामिन अर्ज धाराशिव येथील जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केला होता. या जामीन अर्जावर ॲड. अमोल वरुडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. ॲड वरुडकर यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी त्या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.