परंडा (प्रतिनिधी)- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने आज भव्य मोटारसायकल वरून 'तिरंगा बाईक रॅली' काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन करण्यात आली. ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.“भारत माता की जय“, आणि “वंदे मातरम्“ या गगनभेदी घोषणांनी आणि हवेत फडकणाऱ्या तिरंगा याने वातावरण देशभक्तीमय झाले.

यावेळी भाजपा ग्रामीण मंडळाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहर मंडळाध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, सुखदेव टोंपे, धनाजी गायकवाड, तानाजी पाटील, बाबासाहेब जाधव, हनुमंत पाटील, अजित काकडे, सारंग घोगरे, तुकाराम हजारे, परसराम कोळी, दत्ता ठाकरे, श्रीमंत शेळके, डॉ. अमोल गोफणे, साहेबराव पाडुळे, अर्जुन कोलते, विलास खोसरे, राहुल जगताप, नागेश शिंदे, सुजित परदेशी, राहुल फले, रामदास गुडे, तुषार नेटके, नागेश गर्जे, पोपट सुरवसे, सागर पाटील, योगेश डांगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, मनोहर पवार, मिलिंद शिंदे, तुषार कोळेकर, सिध्दीक हन्नुरे, व्यंकटेश दिक्षित, गौरव पाटील, अमर ठाकूर, आकाश मदने, सुरज काळे, समाधान कोळेकर, विवेक ठक्कर, हिमालय वाघमारे, शिवम भातलवंडे तसेच ग्रामीण व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 
Top