धाराशिव (प्रतिनिधी)- शालनबाई नागनाथराव नाईकवाडी वय 79 रा. कौडगांव हल्ली मुक्काम धाराशिव यांचे प्रदीर्घ आजाराने दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर रात्री नऊ वाजता कौडगाव येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. छ.संभाजीनगर येथील सेवानिवृत्त उपविभागीय जलसंधारण अधिकारी राजेंद्र नाईकवाडी यांच्या त्या मातोश्री होत.