भूम (प्रतिनिधी)- व्याजाच्या पैसे परत करण्याच्या कारणावरून तीन जणांनी बेदम मारहाण करत एक जण गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. मात्र आरोपी मोकाट फिरत आहेत.
बालाजी भायगुडे या तरुणाला तीन आरोपींनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अनिल चोरमले यांच्याशी संपर्क साधला असता आरोपींचे मोबाईल ट्रेस साठी टाकले असून एक पथक ही आरोपीच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे. असे त्यांनी सांगितले.