नळदुर्ग (प्रतिनिधि) शिवसेना नळदुर्ग शहर शाखेच्या स्थापनेस 37 वर्षे पूर्ण झाली. या शाखेचा वर्धापन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त ठाकरे कुटुंबीय व पक्क्षाशी निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील, उमरगा लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, सोलापूर जिल्हाप्रमुख अजय दासरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामलताई वडणे, सोलापूर जिल्हा समन्वयक अतुल भवर, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, माजी तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील, तालुका उपप्रमुख सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मागील 37 वर्षापासून शिवसेनेशी व ठाकरे कुटुंबीयांशी प्रामाणिक असणाऱ्या माजी नगरसेविका सौ. लीलूताई दशरथ मोर्डे जाधव, विलास जाधव, देवानंद सुरवसे, बसवराज जमादार, बंडू मोरे, सज्जाद बागवान, युवराज भोसले, सुनील पाटील, प्रदीप जोशी, लिंबराज कदम, रघुनाथ कोकरे, भीमाशंकर गिराम, श्रीहरी बाबर, भोजप्पा परशेट्टी, इंद्रजीत जाधव, विलास कोरे, प्रकाश मुळे, गुंडूसिंग कैलास परिहार, मनोज बेले, वैजनाथ बिराजदार, अशोक घोडके, राजेंद्र इगवे, पद्माकर पाटील, मोहनसिंग चव्हाण, मुकुंद कुलकर्णी, लक्ष्मण बेंडकाळे, दत्ता पाटील, रमेश वाघोले, सुनील राजमाने, ज्योतिबा दस, विष्णू घोडके, शेकुंबर शेख, राजेंद्र साखरे, सुनील छत्रे सावकार, बाबुराव ढोपरे, राजेंद्र गुरव या ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचे नूतन पदाधिकारी राजअहमद पठाण, डॉ. जितेंद्र कानडे, श्याम पवार, दिनेश दत्ता बंडगर, श्रीकृष्णात मोरे, अमोल गवळी, अर्जुन साळुंखे, राहुल खपले या सर्वांचा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन सत्कार सत्कार करण्यात आला.
शिवसेना नळदुर्ग शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास शिवसेना तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, रोहित चव्हाण, ग्राहक कक्ष तालुका प्रमुख मेजर राजेंद्र जाधव, माजी नगरसेविका ललिताताई जाधव, शहर प्रमुख संतोष पुदाले, शहर संघटक अर्जुनआप्पा साळुंखे, अनिल छत्रे, हणमंत सुरवसे, संतोष वाघमारे, यशवंत पाटील, सुनिल पाटील, ज्ञानेश्वर भोसले, प्रसाद भोसले, दत्ता भोसले, संजय चव्हाण, नेताजी महाबोले, वैजनाथ बिराजदार, राजेंद्र पाटील, आप्पा गिराम, सिद्राम कारभारी, रघुनाथ टोकरे, विष्णू घोडके, बसू जमादार, शहर व परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.