भूम (प्रतिनिधी)- सोनेरी अक्षरांनी इतिहास लिहिला जावा एवढं अनमोल कार्य लोकशाहीर साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांनी केल आहे. त्यांच्या कार्याची साता समुद्रपार दरवल घेतली गेली. त्याची सोपासना, त्यांच्या विचाराची जाणिव जागृती युवकांनी करावी. अशी अपेक्षा भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर यांनी जयंतीदिनी यक्त केले.
शुक्रवार दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 वा जयंती उत्सव समस्त मातंग समाजाच्यावतीने यूवक नेते जयंती समिती अध्यक्ष प्रदीप साठे, नितीन साठे, सचिन साठे, आकाश साठे, महादेव साठे सौ. अश्विनी साठे यांच्या नेतृत्वात साठे चौक समाज मंदिर येथे साजरा करण्यात आला. अनेकांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला सलाम केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमंत विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, सरचिटणीस आबासाहेब मस्कर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष हेमंत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना ज्येष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, तालुका प्रमुख अनिल शेंडगे , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष विनोद नाईकवाडी, अखतर जमादार, अमोल सूरवसे, पत्रकार चंद्रमनी गायकवाड, दीपक पवार, निलेश शेळके यांच्यासह पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, उपनिरीक्षक सरोदे समाज बांधव पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.