भूम (प्रतिनिधी)- भूमिती नागनाथ देवस्थान मानूर मठ येथे शिवलिंगमूर्ती पुन : प्राणप्रतिष्ठापना व 120 शिव दीक्षार्थींनी घेतली शिव दिक्षा घेत संस्कार  सोहळा  (ता 25 ) येथील पेठ विभागातील  दत्त मंदिरामध्ये  संपन्न झाला .

या कार्यक्रमांमध्ये श्रीगुरु ष .ब्र 108 वीरूपक्ष शिवाचार्य मानवतकर महाराज यांनी आशीर्वाचन करताना सांगितले की ,फक्त देवाचं तर नाव घेतलं ,देवाचं जर चिंतन केलं ,देवाचं जर स्मरण केल्याने कैक जन्माचे पाप निघून जाते. एवढी ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये आहे .फक्त नाव घेऊन बाजूला व्हायचं नसतं .वीर शिव लिंगायत धर्मामध्ये भक्ताने  भक्तीच करायची नाही तर भक्ताने भक्तीत करत देव व्हायचं असतं म्हणून हा दीक्षा संस्कार सोहळा आहे .असे यावेळी आशीर्वाचनांमध्ये मानूरकर महाराज यांनी सद्भागताना सांगितले. सकाळी नागनाथ देवस्थान मानूर मठ येथे शिवलिंग मूर्ती पून :प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली ,त्यानंतर दत्त मंदिरामध्ये होम हवन करण्यात आले. सर्व शिव दीक्षार्थींना विधीवत लिंग पूजा करून शिव दीक्षा संस्कार व शपथ देण्यात आली .त्यानंतर गुरु महाराजांची आरती होऊन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रकाश शास्त्री, ओम प्रकाश स्वामी, मनोज स्वामी, गणेश स्वामी, महेश स्वामी यांनी कार्यक्रमाचे पौराहित्य केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांनी मानूरकर महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी अशोक तोडकर, सिद्धेश्वर मनगिरे, महेश मंनगिरे,विजय सोलापूर, ओम स्वामी,पंकज उंबरे, मधुकर शेटे, महेश होनराव, पत्रकार धनंजय शेटे,ओम स्वामी, श्रीकांत नकाते, अरुण क्षीरसागर, संजय होळकर, बाळासाहेब वासकर, मनोज शाहीर, उमेश मंनगिरे, अमित होळकर, अनिल तोडकर यांच्यासह समाज बांधव महिला भगिनी उपस्थित यांच्यासह वीरशिव लिंगायत समाजातील समाजबांधव भगिनी उपस्थित होते.

 
Top