तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरातील असलेले अनाधिकृत स्टोन क्रशर पर्यावरण परवान्याची मुदत, वाहतूक परवाने, उत्खणन परवाना, हायवे पासुनचे 1 कि. मी. अंतर परिसरात दिलेला परवाना चौकशी करणयाबाबत दि.23 जून रोजी तहसिलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या आदेशाने दि.30 जून रोजी खंडाळा येथील डी.सी अजमेरा यांचे अनाधिकृत स्टोन क्रशर सील केले त्यावेळी मंडळ अधिकारी,तलाठी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
महसूल विभागाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या व पर्यावरण विभागाची अनुमती नसलेल्या दगडखाणी बंद करण्याची कार्यवाही करत. संबंधित मंडळाधिकारी, तलाठी यांनी खाणपटटयाच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन संबंधित खाणपटटा, क्रशर सील केले. त्या ठिकाणी किती ब्रास खडी आणि क्रश सॅन्ड शिल्लक आहे याचा अहवाल सादर तहसिलदार यांच्याकडे केला आहे का ?
संबंधित मंडळधिकारी अधिकारी, तलाठी यांनी मुख्यालयी राहुन खाणपटटा, क्रशरची वेळोवेळी तपासणी करुन मुदत संपलेल्या खाणपटटयातुन उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी स्वतः लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले.