वाशी (प्रतिनिधी)- येथील प्रख्यात वकील, ॲड. दिलीप विश्वनाथ शेरकर (वय अंदाजे 48 वर्ष) यांचे दिनांक 26 जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाशी तालुका व कायदेशीर क्षेत्रात एक अभ्यासू, संयमी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
ॲड. शेरकर हे वाशी तालुका वकील संघटनेचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी दीर्घकाळ न्यायालयीन क्षेत्रात कार्यरत राहून अनेक नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठेने काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर इंदापूर रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, सहकारी वकील, राजकीय क्षेत्रातील नेते,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.