परंडा (प्रतिनिधी)- शनिवार दि.26 जुलै रोजी हर्ष फाऊंडेशनचे सर्वेसर्वा विशाल घोंगडे पाटील यांच्या वाढदिवस निमित्त हर्ष फाऊंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील जि.प. प्रा.शाळा, आसू या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. 

काळाच्या ओघात गावामध्ये अनेक बदल झाले आणि पुढेही बदल होत राहतील. पण गावाच्या उज्ज्वल भविष्याचा कणा असणारे शाळेतील विद्यार्थी यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण तयार करणे आपले आद्य कर्तव्य आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून गावातील सर्व तरुणांनी विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत वाढदिवसाचा इतर वायफळ खर्च न करता शालेय साहित्याचे वाटप करुन गावासमोर एक आदर्श निर्माण केला. 

तसेच आपल्या देशाच्या सीमेवर सेवा बजावणा-र्या आपल्या आजी-माजी भारतीय सैनिकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आणि नवीन शासकिय सेवेत नोकरीस लागलेल्या व्यक्तींचा आसू ग्रामस्थ व हर्ष फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. या अगोदरही शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला हर्ष फाऊंडेशन कडून संपूर्ण शालेय साहित्य दिले होते. आजही विशाल पाटील यांच्या वाढदिनी सर्व विद्यार्थांसाठी टी-शर्ट वाटप करण्यात आले. आजचा विद्यार्थांचा दिवस आनंदात जावा यासाठी गोड खाऊ देण्यात आला.

 
Top