धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी आज धाराशिव व तुळजापूर तालुक्याचा दौरा करून कृषी विभाग,वन विभाग,आत्मा व पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यामध्ये.मायरान यांच्या मुरगास बेलर युनिटची,तसेच 'बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत ‘आई लक्ष्मी फार्म प्रोड्यूसर कंपनी'च्या क्लिनिंग-ग्रेडिंग सेंटर व ऑईल एक्सट्रॅक्शन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली.तसेच श्री.बिभीषण माने (बोरणद वाडी) यांच्या शेततळ्याचे व फळबाग लागवडीचे निरीक्षण करण्यात आले. तीर्थ खुर्द येथे ‘अहिल्यादेवी शेळी व मेंढी महासंघा'ची तपासणी करण्यात आली.
याशिवाय, कृषि विभागामार्फत एमआरईजीएस योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या रमेश खताळ (बारुळ) यांच्या तुती लागवड प्रक्षेत्रास भेट देऊन नव्याने तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. या दौऱ्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने तसेच वन विभाग,पशुसंवर्धन व आत्मा विभागाचे अधिकारी,तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे इतर अधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते.