भूम (प्रतिनिधी)-  येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर कट्टा आयोजित करिअर संसद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ. अनुराधा जगदाळे  होत्या. त्यांनी उपस्थित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर करिअर कट्टा डायरी, बॅच व प्रमाणपत्र देऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सन्मानित देखील केले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपसचिव आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे होते. 

त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर व्यासपीठावर महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा. डॉ. बोराडे, डॉ. गव्हाणे, डॉ. खराटे,  डॉ. सुरवसे, डॉ. पडवळ, डॉ. अलगुंडे एस. एम. व प्रा. राठोड आर.डी., प्राध्यापक कराळे उपस्थित होते. विद्यार्थिनी अंजना काळे यांनी प्रास्ताविक केले.


विद्यार्थी संसदेत यांची निवड 

साक्षी वाघमारे, इरफान पठाण, साबळे तेजस्विनी, जाधव रोशनी, कुंभार राजनंदिनी, पन्हाळे सुहानी, जाधव अनिता, नवगिरे कोमल, पाबळे वैष्णवी, शेख समीना आणि सांगडे शुभम यांनी शपथविधी ग्रहण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.खंदारे, डोंगरदिवे, मसराम, कुटे, भोंग, गायकवाड सर, पवार, तिजारे,  गिरी, सुतार, अंभुरे, आवटे, बारकुल या महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे महाविद्यालय समन्वयक डॉ. अलगुंडे एस. एम. यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालय समन्वयक राठोड आर.डी. यांनी केले.

 
Top