धाराशिव (प्रतिनिधी)-  शाहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. 

तसेच कर्मचाऱ्यांचा अडीअडचणी संदर्भात दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान  विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप छत्रपती संभाजी नगर यांनी अधिकारी व अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे निरासन केले. उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सचिन खटके, अमोल मोरे व पोलीस हावलदार समाधान वाघमारे, विनोद जानराव, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, पोलीस नाईक बबन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोह/ विजय घुगे, आणि इतर पोलीस अंमलदार यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच धाराशिव शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार श्रीमंत क्षिरसागर यांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांची ही प्रशंसा करण्यात आली. तसेच आगामी काळातील सण उत्सवा दरम्यान पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. सदर मिटींगला माननीय अपर पोलीस अधीक्षक शपकत आमना आणि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.


 
Top