sc


कळंब (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथे 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर व महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर भरती संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेचे आयोजन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर व प्राचार्य डॉ. हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक नायब सुभेदार बाजीराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक शारीरिक व शैक्षणिक तयारी, मानसिक स्थैर्य, तसेच भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या टप्प्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले.हवालदार सुनिलकुमार काळे यांनी सैन्य दलातील विविध संधी, पदे व त्यासाठी लागणाऱ्या अर्हता यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव होते. त्यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. पावडे के. डब्ल्यू. यांनी केले. तर आभार लेफ्टनंट सरस्वती वायबसे यांनी मानले. कार्यशाळेस विद्याभवन हायस्कूल कळंब येथील एनसीसी विभागप्रमुख अप्पासाहेब वाघमोडे, प्राध्यापक डॉ. ईश्वर राठोड, डॉ. नागनाथ आदाटे, प्रा. अर्चना मुखेडकर, डॉ. मीनाक्षी जाधव, डॉ. वर्षा सरोदे, डॉ. श्रीकांत भोसले, डॉ. नामानंद साठे हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील व एनसीसी विभागातील एकूण 124 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हनुमंत जाधव (अधीक्षक), अरविंद शिंदे (सहायक ग्रंथपाल), मोमीन गाजी, संदीप सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top