धाराशिव (प्रतिनिधी)- नूतन प्राथमिक विद्यामंदिर, धाराशिव येथे थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे यांनी टिळकांच्या जीवनावर भाषण करताना त्यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य उलगडून दाखवले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि निबंध सादर करून कार्यक्रमात रंग भरले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच“ या टिळकांच्या बोधवाक्याने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.