धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील ज्येष्ठ साहित्य युवराज नळे यांनी लिहिलेल्या 'तिच्या कविता' या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय समरसता साहित्य पुरस्कार घोषित झाला असून सदरील पुरस्काराचे वितरण तीन ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणाऱ्या विसाव्या समरसता साहित्य संमेलन मध्ये आयोजित समारंभात करण्यात येणार असल्याबाबतची माहिती खासदार तथा स्वागताध्यक्ष डॉ अजित गोपछडे, माणिक भोसले, डॉ ईश्वर नंदापुरे व डॉ प्रसन्न पाटील यांनी पत्राद्वारे कळविले आहे. 'तिच्या कविता' हा वैशिष्ट्यपूर्ण काव्यसंग्रह असून संपूर्ण पुस्तक हे स्त्रीच्या वेगवेगळ्या भाव रूपांचे दर्शन घडवणा-या असून तज्ञांच्या समितीने गुणवत्तेच्या निकषावर राज्यस्तरीय समरसता पुरस्कार साठी तिच्या कविता काव्यसंग्रहाची निवड केली आहे.